लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रयत्नाने शिवसना भाजपामध्ये युती झाली होती. यामध्ये आता पुन्हा एकदा मिठाचा खडा पडला आहे. औरंगाबाद शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म न पाळणची तक्रार भाजपाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुंबईतील वर्षा बंगल्यावर केली आहे. यामुळे सेना भाजप संघर्षात वाढ शक्यता नाकारता येत नाही.
राज्यामध्ये शिवसेना हा भाजपाचा मित्रपक्ष आहे. औरंगाबाद मध्ये भाजपा-शिवसेना युतीकडून चंद्रकांत खैरे हे अधिकृत उमेदवार होते. तर रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीदेखील निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली होती. जालना लोकसभा मतदारसंघात खोतकर यांची बंडखोरी मोडीत काढत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांची समजुत घातली होती. त्याप्रमाणे दानवेंनी आपल्या जावयाची समजुत घातली नाही. तसेच, प्रचारादरम्यान भाजपाच्या काही नगरसेवकांनी हर्षवर्धन जाधव यांचा उघड प्रचार केलासा आरोप खैरे यांनी केला आहे. आ. हर्षवर्धन जाधव यांनीदेखील अतिशय खालच्या दर्जाचा प्रचार आपल्याविरोधात केला. भाजप नगरसेवकांनी दानवे यांच्या सांगण्यावरुनच हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याची खैरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.